जळगाव प्रतिनिधी । हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका तरूणाला जिल्हा न्यायालयाने सहा महिने व दोन हजार रूपयांचा दंड सुनावला आहे. या शिक्षेवर आरोपीने केलेल्या अपीलावर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याच्या शिक्षेचा निकाल कायम ठेवला आहे.
याबाबत माहिती अशी की, “छोटू सुदाम पुजारी (वय-२९) रा. हरीविठ्ठल नगर जळगाव असे आरोपीचे नाव असून त्यास जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, धुळे या जिल्हयातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो जळगाव शहरात मिळून आल्याने दि. ७ मे २०११ रोजी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला हरिविठ्ठल नगरातून अटक करुन कारवाई केली होती.
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होवून तपासधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल काशिनाथ कोळंबे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात न्यायालयाने आरोपी छोटू पूजारी यास सहा महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षविरुध्द आरोपी छोटू पूजारी याने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते.
त्या अपीलावर जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालयात एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात त कामकाज झाले. शुक्रवार, दि. २१ जानेवारी रोजी अपिलावर सुनावणी झाली. यात न्या. एस.डी. जगमलानी यांनी शिक्षेचा निकाल कायम ठेवला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ऍड. प्रदीप महाजन यांनी युक्तीवाद केला.