अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वादातून झालेल्या दंगल प्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, तळवाडे येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वादातून विनोद पवार यांच्यासह इतरांना मारहाण करण्यात आली. यात विनोद सुखदेव पवार यांनी फिर्याद दिली की तो घरी टिव्ही पाहत बसलेले होते त्यावेळी तरवाडे गावातील आरोपी धीरज रामकृष्ण पाटील व सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील,समाधान पाटील, कौतीक पाटील, नाना पाटील, किशोर पाटील, नंदलाल पाटील, नामदेव पाटील, शिवाजी पाटील, श्रीराम पाटील ,अशोक पाटील, मनोहर पाटील , छोटू पाटील , गुणवंत पाटील,
राजेंद्र पाटील, रामकृष्ण आसाराम पाटील ,योगेश पाटील , बापू पाटील , शरद पाटील ,हिम्मत पाटील , पृथ्वीराज पाटील यांच्यासह इतरांनी मारहाण केली. यातील धीरज रामकृष्ण पाटील यांचे हातात लोखंडी टॉमी, किशोर नाना पाटील याच्या हातात लाकडी काठी तर गुणवंत मनोहर याचे हातात दगड होते. त्यांची विमलबाई ही सोडवण्यास आली असता तीला देखील वरील लोकांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. यासोबत संशयितांनी कमलाकर पाटील, नितीन उखा पाटील, उखा बुधा पाटील आदी भांडण सोडविण्यासाठी आले असता त्याना देखील वरील लोकांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. यावरून मारवड पोलिसात भादवि ४५२,३२४, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ , ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे २६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक संजय
गोरे, डीवायएसपी राजेंद्र ससाणे यांनी भेट दिली एपीआय समाधान पाटील यांनी आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.