एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल पोलिसांनी शहरातील महाजन नगर परिसरात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीतील आरोपीला अवघ्या १५ दिवसात अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील महाजन नगर येथे दि .८ मे रोजी मेहरबान नाथ सिदुनाथ सोळंकी (शिल्पकार) यांच्या राहत्या घरी घरफोडी होऊन यात २ लाख ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी गेला होता.त्यात तीन मोबाईल व रोकड चा समावेश होता.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव भाग जिल्हा जळगाव कविता नेरकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल,पो.ना.अकील मुजावर,पो.शी.आकाश शिंपी,पंकज पाटील यांनी गुन्हातील फिर्यादी यांच्याकडून चोरी झालेल्या मोबाईल क्रमांकाचे आय एम ई आय क्रमांक प्राप्त करुन त्याचा आय एम ई आय.सी. डी.आर.व घटनास्थळाचा सेल आय डी डमडाटा काढला होता.
त्यातून आरोपीचा एक नंबर चालू झाल्याचे निष्पन्न करुन कुवरसिंग गंगाराम खर्चे वय २३ रा. गुडा शहापुर तालुका सेंदवा जि.बडवानी (म.प.) या आरोपीचा शोध घेऊन त्यास दि.२४ मे २०२४ रोजी धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथुन ताब्यात घेतले व गुन्ह्यातील चोरी झालेल्या तीन मोबाईल पैकी एक विवो कंपनीचा वाय ३५ गोल्ड ८/१२८ अंदाजे २० हजार रुपये किमतीचा हस्तगत केला व ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून सदर गुन्ह्यात सुनील बारेला आणि कालु बारेला हे अजून दोन आरोपी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून ते फरार आहेत. आरोपी कुवरसिंग गंगाराम खर्चे यास २७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.