भुसावळ येथील लैंगिक अपराधातील फरार आरोपी मुंबईतून ताब्यात

bhusaval aaropi

भुसावळ, प्रतिनिधी | शारीरिक छळ व बाल लैंगिक अपराधामधील गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस मुंबई येथून भुसावळ बाजारपेठे पो.स्टे. च्या पथकाने आज (दि.१६) ताब्यात घेतले आहे.

 

याप्रकरणी येथील बाजारपेठे पो.स्टे.ला भाग ५ गुरन ०३९०/२०१९ भादंवि कलम-३५४,३५४(अ)(ब)तसेच बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कलम- ७, ८ व १२ प्रमाणे दि.११-०७-२०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्ह्यातील आरोपी गुन्हा करून आरोपी फरार झालेला होता. त्याच्याबद्दल पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तो मुंबई येथे असल्याचे कळले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या परवानगीने तपास पथक मुंबई येथे रवाना करण्यात आले होते.

आज या पथकाने आरोपी सुरेश अंबादास गायकवाड (वय-३०) रा. न्यू आय.एम.पार्क, वाशीनाका, चेंबूर यास आरसीएफ पोलीस स्टेशन चेंबूरमधील पोलिसांच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेतले.सदरची कार्यवाही पो.ना. रमण सुरळकर, पो.कॉ. विकास सातदिवे व ईश्वर भालेराव यांनी केली.

Protected Content