भुसावळ प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी शहरात आढळून आल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, गुरूवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नहाटा कॉलेजच्या पुढे दोन वर्षांकरीता हद्दपार असलेला आरोपी प्रशांत ऊर्फ मुन्ना संजय चौधरी (वय-२८ रा.पंढरीनाथ नगर भुसावळ) हा शहरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करत असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पो. अधीक्षक भाग्यश्री नवटके, उप.पो.अधिकारी गजाजन राठोड, निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्थानकाचे स.पो.नि अनिल मोरे, स.फौ.तस्लीम पठाण पो.हे.कॉ संजय भदाणे पो.ना संदिप परदेशी पो.कॉ उमाकांत पाटील,कृष्णा देशमुख,प्रशांत परदेशी यांच्या पथकाने केली.
संबंधीत आरोपी हा महाराष्ट्र शासन तसेच अधिक्षक जळगाव यांचे आदेशाचे उल्लंघन करुन भुसावळ शहरात मिळुन आला म्हणुन त्यावर भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग ६ गु.र.न १४ /२०२० ( महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे ) गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.हे.कॉ सुनील जोशी करीत आहेत. आरोपी प्रशांत ऊर्फ ( मुन्ना ) संजय चौधरी हा हिस्ट्रिशिटर व रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.