उसनवारीने घेतलेल्या पैशांवरून न्यायालयाच्या आदेशानुसार 2 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शालकासह सासूने जावायाकडून 5 लाख रुपये घेवून स्वत:च्या चैनीसाठी त्याचा फायदा करुन घेतला. जावायाने पैशांसाठी तगादा लावला असता, शालकाडून मी शाळेतून राजीनामा देवून माझ्या जीवाचे बरेवाई करुन घेण्याची धमकी दिली. अखेर चंद्रकांत नारायण वानखेडे (वय ५१, रा. राका पार्क) यांनी न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला होता. त्यावर काजकाज झाल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर संशयित अजय चिंधू डोळे व मालती चिंधू डोळे दोघ रा. भालोद, ता. यावल यांच्याविरुद्ध शुक्रवारी २८ जून रोजी रात्री ९ वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राका पार्कमध्ये चंद्रकांत वानखेडे हे वास्तव्यास असून ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नोकरीला आहे. जुलै २०१६ मध्ये वानखेडे यांचा शालक व सासूने त्यांना तीन महिन्यात परत करण्याच्या मुदतीवर पाच लाख रुपये उसनवारीने मागितले होते. त्यानुसार वानखेडे यांनी कर्मचाऱ्यांच्या पतपेढीतून कर्ज काढून त्यांना पाच लाख दिले होते. तीन महिन्यानंतर वानखेडे यांनी शालक अजय डोळे याच्याकडे पैशांची मागणी केल्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. परंतु पैशांसाठी तगादा वाढतच असल्याने डोळे याने ५० हजारांचे दोन चेक त्यांना दिले होते. मात्र त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते दोघ चेक बाऊन्स झाले होते. त्यामुळे वानखेडे यांनी शालक अजय डोळे याला ॲड. शुभम त्रिपाठी यांच्या मार्फत नोटीस पाठवली होती.

…अ
पैशांसाठी चंद्रकांत वानखेडे यांनी तगादा सुरुच ठव्ेाल्याने अजय डोळे हा मेव्हणांना मी शाळेतून राजीनामा देवून टाकतो, आणि माझ्या जीवाचे बरे वाईट करु न घेईल अशी धमकी देखील त्याने दिले होते. यावेळी वानखेडे हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नव्हती.

….अ
संशयित शालकासह सासूकडून धमकी मिळत असल्याने वानखेडे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. वारंवार पैसे मागून देखील पैसे मिळत नसल्याने वानखेडे यांना शालकाने त्यांच्या पैशांचा वापर हा स्वत:च्या चैनीसाठी केल्याची खात्री झाली.

….तक्रारदार वानखेडे यांनी विधी सेवा केंद्रात दाद मागून तडजोडीसाठी पत्रव्यवहार केला. मात्र संशयित त्याठिकाणी उपस्थित राहीले नाहीत. शालकासह सासूकडून जावयाची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर कामकाज होवून न्यायालयाने गुन्हा दाखलचे आदेश दिले. त्यानुसार अजय चिंधू डोळे (रा. भुसावळ) व त्याची आई मालती चिंधू डोळे (रा. भालोद, ता. यावल) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content