Home Uncategorized सट्टेबाजारानुसार उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री

सट्टेबाजारानुसार उद्धव ठाकरेच होणार मुख्यमंत्री

udhav
udhav


udhav

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मिळून सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सत्ता परिवर्तनावरही आता सट्टा सुरु झाला आहे. यामध्ये महासेनाआघाडीकडून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असा सट्टाबाजाराचा कल आहे.

 

सध्या सट्टा बाजारात सर्व बुकींचे आवडते उद्धव ठाकरे ठरत आहेत. सट्टा बाजारात सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील याचा भाव 65 पैसे सुरु आहे. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील यावर दोन रुपये, असा भाव आहे. तर आदित्य ठाकरे आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील यावर सहा रुपये भाव देण्यात आला आहे. दरम्यान, सट्टेबाजारात ज्या व्यक्तीला सर्वाधिक पसंती असते त्याचा भाव हा नेहमी कमी लावला जातो. तर त्या उलट ज्या व्यक्तीला लोकांकडून कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो त्यांचा भाव नेहमी सर्वाधिक असतो.

 


Protected Content

Play sound