एक्झिट पोलनुसार ‘आयेगा तो मोदी ही’

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान 1 जून रोजी संपले. सात टप्प्यांत झालेल्या मतदानासोबतच एक्झिट पोलही आले आहेत. विविध यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला मोठा फटका बसला आहे. देशभरात सात टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. ते आकडे पुढीलप्रमाणे आहे.

1. रिपब्लिक टीव्हीनुसार एनडीए आघाडी – ३५९, इंडिया आघाडी – १५४, इतर – ३०
2. एनडीटीव्ही इंडियानुसार एनडीए आघाडी – ३६५, इंडिया आघाडी – १४२, इतर – ३६
3. जन की बातनुसार एनडीए आघाडी – ३६२ – ३९२, इंडिया आघाडी – १४१ – १६१, इतर – १०-२०, इंडिया
4. न्यूज डी + डायनामिक्सनुसार एनडीए आघाडी – ३७१, इंडिया आघाडी – १२५, इतर – ४७

९ एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्रास संपला असून अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झाला आहे. याबरोबरच देशातील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ४४ दिवसांपासून सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एक्झिट पोलमधून देशाचा कल समजला आहे.

Protected Content