ब्रिटनमधील संस्थेच्या सर्वेक्षणानुसार कॉंग्रेसची बहुमताची सत्ता

WhatsApp Image 2019 04 27 at 8.43.32 PM

पुणे (वृतसेवा) ब्रिटनमधील एका संशोधन संस्थेने केलेल्या सर्व्हक्षणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष २१३ जागा मिळवून सत्तेवर येईल असा अंदाज पुढे आला आहे. सत्ताधारी भाजपला १७० तर अन्य प्रादेशिक पक्षांना १६० जागा जिंकता येतील असेही या सर्वक्षणामधून समोर आले आहे.

 

ब्रिटनमधील या संस्थेने भारतातील २४ राज्यातील २० हजार ५०० नागरिकाची मते पडताळून पहिले. यात ५२ टक्के पुरुष व ४८ टक्के महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्वक्षणाबाबत  ब्रिटनमधील पत्रकार ग्रब्रिएल पिकार्ड व्हाईटहेड यानी आपल्या ब्लॉगवरूनही माहिती दिली आहे. परंतु, या संस्थेचे नाव किवा या सर्वक्षणाचा कालावधी त्या ब्लॉगमध्ये जाहीर करण्यात आलेला नाही.  आता सुरु असलेल्या निवडणुकीत बेरोजगारी, महागाई, नोटाबंदी आणि शेतकऱ्यांचे प्रभावी ठरणार आहेत. तसेच शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण तसेच इंधनाच्या वाढत्या किमती, वाहतूक, किमान आधारभूत किमत आणि अल्पसंख्याकांना मिळत असलेली वागणूक यांचाही प्रभाव आहे, असे सर्वक्षणातून दिसते असे व्हाईटहेड यांनी लेखात म्हटले आहे.

Add Comment

Protected Content