
गोदिंया (वृत्तसंस्था) ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चार मजुर जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यातील डव्वा गावाजवळ घडली आहे.
मागील गेले दोन दिवसापासून गोंदियामध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीची कामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. डव्वा गावाजवळ एक शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरमधून १४ मजुरांना शेतात लागवडीसाठी घेऊन जात होता. परंतु अचानक ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर नाल्यात पडले. या अपघातात चार मजुर जागीच ठार झाले आहे. तर काहीजण गंभीर जखमी आहेत. अपघातातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.