यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील सातोद येथील रहिवासी रूपेश यशवंत भंगाळे यांचा काल रात्री नाशिक येथे झालेल्या अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, सातोद येथील मुळ निवासी आणि मागील १० वर्षांपासुन नाशिक येथे नोकरीस असलेले रुपेश यशवंत भंगाळे (वय-३५) हे काल (दि.१३) रात्री ८.०० वाजेच्या सुमारास आपल्या मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपुन आपल्या मित्रासोबत मोटारसायकलने घरी येत असतांना मुंबई-आगरा महामार्गावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने रुपेश भंगाळे हे जागीच मरण पावले असुन त्यांच्यासोबत असलेल्या मित्राचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. रुपेश भंगाळे हे सातोद येथील माजी पंचायत समिती सदस्य यशवंत भंगाळे यांचे पुत्र होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत कळताच सातोद गावात शोककळा पसरली असून रूपेश भंगाळे यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.