Home धर्म-समाज नाशिकमध्ये बिबट्याचा अपघाती मृत्यू

नाशिकमध्ये बिबट्याचा अपघाती मृत्यू



नाशिक (वृत्तसंस्था) येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारात मनमाड-नगर राज्य महामार्गालगत गुरुवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तो बिबट्या ठार झाला असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला. येवला येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. सुमारे दोन ते तीन वर्षे वयाचा हा नर बिबट्या आहे.  नाशिक तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या लोहशिंगवे येथे पहाटे ३.०० च्या सुमारास निवृत्ती भिमा जुंद्रे यांच्या मळ्यात बिबट्याने दावणीला बांधलेल्या दोन गायींवर हल्ला केला. या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दोनपैकी एका गाईचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी गाय बेपत्ता आहे. ती बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीनं पळून गेली की बिबट्यानं नेली, याचा शोध सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound