प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघाती मृत्यू

76918980 2593481264073581 6136471447993843712 n

 

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकच्या प्रसिद्ध गायिका गीता माळी(वय 40) यांचा आज एका भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

 

गीता माळी या मागील दिड महिन्यांपासून त्या अमेरीकेत कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्या आज सकाळी भारतात परतल्या. त्यांचे पती विजय माळी त्यांना घेण्यासाठी मुंबईला गेले होते. विजय माळी हे स्वतः होंडा सिटी गाडी चालवत होते. नाशिकला येत असताना शहापूरजवळ त्यांचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट डिव्हाडर तोडून समोर असलेल्या आईलच्या ट्रकवर धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रकचा काही भाग गाडीचा काच तोडून आत शिरला आणि गीता माळी यांच्या शरीरात घुसला, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती विजय माळी गंभीर जखमी झाले.

Protected Content