पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वे अपघातात दुदैर्वी मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय आत्माराम पाटील (वय-५१) यांचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे अपघातात छिन्नविछिन्न परिस्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख आज नातेवाईकांकडून पटल्याने शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. या घटनेचे वृत्त चोपडयात येऊन धडकताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर ते टाकरखेडा दरम्यानच्या रेल्वे रूळावर १२ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजता अनोळखी छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होत. मृतदेह अमळनेर पोलिसांकडे सोपविण्यात आल्यानंतर बॉडीची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले, मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला. पोलिस तपास सुरू असतांना आज चोपडा शहर पोलिसात मिसिंग गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी सदरील बॉडीची खात्री केली असता मयताचे कपडे व चप्पल वरुन पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील यांची बॉडी असल्याचे त्यांच्या पत्नीने ओळखले. यावरून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात जाऊन खात्री केली असता पत्नीने आपल्याच पतीचा मृत्यूदेह असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहेत.

पोलिस कॉन्स्टेबल संजय पाटील हे चोपडा येथील महावीर नगरातील रहिवासीअसून ते शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन, अमळनेर पोलिस स्टेशन, सध्या अडावद पोलिस ठाणे याठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Protected Content