एरंडोल प्रतिनिधी । श्रावण सोमवार निमित्त श्री क्षेत्र पद्मालय येथे भरलेल्या यात्रेनिमित्त गणेश दर्शन घेऊन परत जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला झालेल्या अपघातात साधारण ३० भाविक जखमी झाले आहेत. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या ७ ते ८ जणांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, श्री क्षेत्र पद्मालय येथे भरलेल्या यात्रेनिमित्त गणेश दर्शन करून सोनबरडी येथे परत जाणारे भाविकांचे ट्रॅक्टर व एरंडोलकडून पद्मालयकडे भाविकांना घेऊन जाणारी पियाजो रिक्षा या दोन्ही वाहनांमध्ये बूमटे शेता नजीक वळणावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात जवळपास 25 ते 30 भाविक जखमी झाले आहेत. सात ते आठ गंभीर जखमींना एरंडोल ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.