पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील पारोळा एरंडोल महामार्गावरील सार्वे फाट्याजवळ खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने जळगाव तालुक्यातील शिरसोलीचे दाम्पत्य ट्रकच्या पुढच्या चाकात आल्याने जागीच ठार झालेत.
सविस्तर वृत्त असे की, रविवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील मधुकर महारू पाटील (वय ४५ )व त्यांच्या पत्नी प्रतिभा मधुकर पाटील (वय ४०) या जागीच ठार झाल्या. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून पसार झाला आहे. अपघातानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त गेल्या १२ दिवसांपूर्वी देखील महामार्गावरील म्हसवे शिवारात अपघात होवून एकाचा बळी गेला होता. हा अपघात देखील महामार्गावरील खड्ड्यांमुळे झाला. मात्र त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. आज सकाळी झालेला अपघातदेखील खड्डे चुकवताना झाल्याने दाम्पत्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. जळगाव एरंडोल पारोळा दरम्यान महामार्गाची अक्षरशःचाळण झाली असून अपघात नित्याचे झाले आहेत. किमान आता तरी तक्रारीची दखल घ्यावी अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहेत. अपघातप्रसंगी डोक्यात हेल्मेट नसले तर आपण चालकास दोष देतो. मात्र शिरसोली येथील अपघातात मधुकर पाटील यांनी हेल्मेट घातलेले होते. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकच्या पुढील चाकाखाली दाम्पत्य दाबले गेले, अपघात एवढा भयानक होता की अपघातग्रस्त पती-पत्नीच्या पोटावर ट्रकचे उभे होते. दुर्दैवीप्रसंग न बघण्यासारखा होता. अपघातानंतर पारोळा पोलिसांना अपघाताची माहिती कळताच पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे, काशीनाथ पाटील,पंकज राठोड, विनोद माळी,सुनील साळुखे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मदतीसाठी रुग्णवाहिचे चालक ईश्वर ठाकूर व त्यांचे सहकारी यांनी मोठा परिश्रम घेतला.