जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज सकाळी मारूती सुझुकी एर्टीगा आणि माल वाहतूक करणार्या रिक्षाचा अपघात झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मोठा गतीरोधक आहे. येथे आज सकाळी अपघात झाला. जळगावहून भुसावळकडे जाणार्या एमएच१९ बीजे ५४०४ या क्रमांकाच्या एर्टीगाला सिन्नरहून न्हावी (ता. यावल) येथे जाणार्या मालवाहू रिक्षाने मागून धडक दिली. गतीरोधकावर हा अपघात घडला. यात रिक्षा आणि एर्टीगाचे नुकसान झाले आहे.