चोपडा प्रतिनिधी । शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजकवळ ट्रक, अँपेरिक्षा आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात होऊन एक ठार तर तीन जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये निवृत्ती एकनाथ पाटील (४२) यांचेे निधन झाले तर गोरख मणिराम पाटील (६४) धनराज संतोष पाटील (५२) आणि सुखदेव गिरधर पाटील (६८) या गंभीर झालेल्या जखमींना तत्काळ उपचार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. यातील मयत व जखमी हे शिरपूर तालुक्यातील तरडी गावातील रहिवासी असून त्यांना तातडीने जखमींना रुग्णालयात हालविण्यात आले आहे अपघात घडल्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर जाम झाली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यावर पोलिसांनी ट्राफिक मोकळी करून रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर आली.