Home क्राईम पाळधीनजीकच्या अपघातात एक ठार; तीन जखमी

पाळधीनजीकच्या अपघातात एक ठार; तीन जखमी

0
39

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावानजीक दोन ट्रक्सने एकमेकांना दिलेल्या धडकीत एक जण ठार झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पाळधी गावाच्या जवळ एमएच४८ टी ८७८४ क्रमांकाच्या ट्रकला दुसर्‍या ट्रकने धडक दिली. यात या ट्रकमधील क्लिनर जागीच ठार झाला असून दोन्ही चालकांसह एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात हलविण्यात आले आहे. यात मृत झालेला व्यक्ती हा त्याच्या वडिलांसोबत या ट्रकवर कामाला असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. महामार्ग पोलीसांचे पीएसआय दिलीप पाटील, एएसआय खैरनार, सोपान पाटील, प्रकाश मेढे, युसुफ शेख आणि प्रदीप रणीत यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound