जळगाव प्रतिनिधी । येथून जवळच असणार्या नशिराबाद जवळ राष्ट्रीय महामार्गावर इनोव्हाने रिक्षाला दिलेल्या धडकेत दोन ठार तर तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, नशिराबाद जवळ राष्ट्रीय महामार्गावर जुन्या टोल नाक्याजवळ आज पहाटे एमएच १० सी ९०९९ या क्रमांकाच्या इनोव्हाने रिक्षाला (एमएच१९ व्ही ७२२८) जोरदार धडक दिली. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. ही रिक्षा नशिराबाद येथील असून यातील दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान, याबाबत नशिराबाद पोलिसात गुन्हा नोंदणीचे काम सुरू होते.