पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसवे जवळ राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे.
पारोळा महामार्गावरील हॉटेल सहयोग जवळ अज्ञात वाहनाची अज्ञात इसमास चिरडले आहे. त्याच्या उजव्या हाताच्या कामेवर सुनील असे गोंदलेले असून डाव्या कानात बाही आहे तर उजव्या हाताच्या मनगटावर लाल धागा बांधलेला आहे.
पारोळा तालुक्यातील म्हसवे जवळ सहयोग हॉटेलच्या पुढे एक पुरुष अज्ञात वय २५ ते ३० या ईसमास कोणीतरी अज्ञात वाहनाने आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास चिरडल्याने जागीच मयत झाला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या संदर्भात पारोळा पोलिस ठाणे येथे त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांनी केले आहे.