जळगाव प्रतिनिधी । शहरातील मानराज पार्कजवळ महामार्गावर कार बसवर धडकल्याची घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धुळे-जळगाव (क्रमांक एमएच-२०, बीएल- ३३६३) ही बस धुळ्याकडून मानराज पार्कजवळ आली असता शहरातून जाणारी कार (क्रमांक एमएच- ३१, बीबी- ९४०५) ही राँग साइडने बसला जाऊन धडकली. यात कार चालक गणेश गंगाराम शिरसाठ (वय ३०, रा. मोहननगर) जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.