Home Cities जामनेर जामनेर-पहूर दरम्यान अपघातात दोन ठार

जामनेर-पहूर दरम्यान अपघातात दोन ठार

0
87

जामनेर प्रतिनिधी । जामनेर ते पहूरच्या दरम्यान आज सकाळी झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सकाळी सात वाजेच्या सुमारास जामनेर कडून पहुर रस्त्याने जाणार्‍या मोटर सायकलला पियाजो रिक्षाची जोरदार धडक बसल्याने मोटर सायकलवरील दोघ जागीच ठार झाले तर सोबत असलेली मुलगी गंभीर झाल्याचे वृत्त आहे. प्रत्यक्ष घटना बघणारे यापैकी काहीनी सांगितले की एका आयशर ट्रकने पियाजो रिक्षाला कट मारला त्यामुळे रिक्षाच्या चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षाची जोरदार धडक मोटर सायकलला बसली. दोघांचे मृतदेह जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले असून मुलीवर उपचार सुरू आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound