यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चितोडा गावाजवळ दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात मारूती ओमनीने पलटी घेतल्याने यातील मजुरांना दुखापत झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, एमएच १९ एई-६८६९ या क्रमांकाची मारूती ओमनी ही चारचाकी भरधाव वेगाने जात असतांना समोरून एक दुचाकीस्वार वेगात आला. याला वाचवण्याचा चालकाने प्रयत्न केला असता या कारने रस्त्यावर चार-पाचदा पलटी घेतली. यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. सुदैवाने यावेळी रस्त्यावर दुसरे कोणतेही वाहन नसल्यामुळे प्राणहानी झाली नाही. या कारमध्ये गाते (ता. रावेर) येथील मजुर होते. त्यांना यात किरकोळ दुखापत झाली आहे.