Home क्राईम गुजरातमधील अपघातात बोदवडच्या तरूणीचा मृत्यू

गुजरातमधील अपघातात बोदवडच्या तरूणीचा मृत्यू

0
58


बोदवड प्रतिनिधी । गुजरातमधील वलसाड शहराजवळ झालेल्या अपघातात दाम्पत्य ठार झाले असून यातील महिला ही येथील माहेरवाशीण आहे.

याबाबत माहिती अशी की, बोदवड येथील प्रफुल्ल बुगडी यांची कन्या नम्रता (वय२४) हिचा विवाह वलसाड येथील हेमल गादिया (वय २७) यांच्यासोबत झालेला आहे. हे दाम्पत्य वलसाड येथील आपल्या घरी परतत असतांना त्यांची कार पुलाखाली पडल्याने झालेल्या अपघातात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज पहाटे दोनच्या सुमारास घडला. हे वृत्त येताच परिसरात शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound