आधार-पॅनकार्ड लिकिंगची 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

AadharPan link

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । पॅन कार्ड आणि आधार क्रमांक येत्या ३० सप्टेंबरपर्यंत लिंक केले नाही तर १ ऑक्टोबरपासून तुमचे पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजेच निष्क्रिय होणार आहे. मुदत तारखेच्या आत जर पॅनक्रमांक अधार क्रमांकाशी लिंक न झाल्यास ते इनव्हॅलिड (अमान्य) मानले जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरकारने इन-ऑपरेटिव्ह म्हणजे, नक्की काय कार्यवाही होईल, याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. पॅन कार्ड दिलेल्या मुदतीत आधारशी लिंक केले नाही तर ते अमान्य असेल. जुलै २०१९मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन-आधार लिंक करण्याच्या नियमांत बदल करण्यात आले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ३१ मार्च २०१९ रोजी पॅन आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. पॅन-आधार लिंक करण्यासंबंधीचा नियम १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. पॅन-आधार क्रमांक दिलेल्या मुदतीत लिंक केला नाही तर पॅन कार्ड इन-ऑपरेटिव्ह मानले जाईल.

Protected Content