पहूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर- शेंदुर्णी रोडवर कपाशीने भरलेला आयशरची दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने वाहन पलटी होवून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे.
पहूर शेंदुर्णी रोडवर पहूर येथून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरासमोर शुक्रवारी रात्री शेंदुर्णीकडून पहूरकडे येणाऱ्या कपाशीने भरलेल्या ईकोमेन्ट आयशर क्रमांक (एमएच २८ बीबी ५९९२) ही आयशर गाडीने दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने वाहन पलटी होवून आपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान नेमके याच ठिकाणाहून डीव्हायडरला सुरुवात झाली आहे. या दुभाजकाची साईज लहान असल्याने वाहन चालकांना समजत नसल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात. पहूर येथे गेल्या आठ दिवसापासून अपघाताची मालिका सुरूच असून आठ दिवसात परिसरात झालेल्या अपघातामुळे तब्बल ५ जणांचा बळी या सतत झालेल्या अपघाताने घेतला असून परिसरातील लोक मात्र या सततच्या अपघातामुळे भयभीत झाले आहे.