कुरंगी (प्रतिनिधी) सामनेर (ता. पाचोऱा) येथे आज दुपारी ३.३० च्या सुमारास एस.टी. बस-पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक झाल्याने बस मधील चालकासह १९ प्रवासी जखमी झाले आहेत. पिकअप व्हॅनचा चालकही या अपघातात जखमी झाला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगावकडून येणारी एस.टी. बस (क्र.एम.एच.१४, ए.बी.०४१६) व पाचोऱ्याहून जळगावकडे बारदान भरून जाणारी पिकअप व्हॅन एम.एच.१९, बी.एम.२७४९) याची समोरासमोर धडक झाली यात बसमधील चालकासह अन्य तीन प्रवाशांना जबर मार लागल्याने त्यांना लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर किरकोळ जखमींना प्राथमिक इलाज करून पाचोरा येथे पाठविण्यात आले आहे.
जखमींमध्ये चालक भागवत धनगर, वाहक सौ.एस.के. सावळे, ज्योती बाविस्कर, यश बाविस्कर (जळगाव), जानकाबाई राजपूत (नागद), छाया राजपूत, मीराबाई राठोड, शंकर राठोड (तलंबन तांडा), संगीता पाटील व तीन मुले (मोहरुन, ता. चोपडा), तुकाराम पाटील, कोकिळा पाटील (पिपळगाव हरे), सुरेखा पाटील (देशमुखवाडी), सविता मोरे (अंजनविहिरे), शेबाज शेख पटेल (माहिजी), विकास कोळी, यशवंत पाटील (नगरदेवला), इंदूबाई कुंभार (पिंप्राळा) यांचा समावेश आहे. अपघात होताच सामनेर येथील ग्रामस्थ मदतीसाठी अपघातस्थळी धावले. त्यांनी जखमींना अन्य वाहनात बसवून उपचारार्थ पाठवले. तसेच घटनास्थळी डॉ. अशोक वाणी यांना बोलावून जखमींवर प्राथमिक उपचार करवले.