जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठाने वाढविलेल्या भरमसाठा शुल्काच्या विरोधात सोमवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता निदर्शने करण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक वर्षांसाठीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशफी आणि परिक्षा फीमध्ये मोठ्या प्रमाणावर आकारणी केली जात आहे. या शुल्कवाढीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सामेवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आले.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन विद्यापीठाच्या प्रशासनाला देण्यात आले आहे. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला होता. याप्रसंगी प्रांत मंत्री अंकिता पवार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही अन्यायकारक शुल्कवाढ तातडीने कमी करावी व विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी कुलगुरू प्रा. डॉ. व्हि.एल. माहेश्वरी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
प्रसंगी विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, प्रांत शोध कार्य संयोजक अश्विन सुरवाडे, जिल्हा संयोजक मयूर माळी, चंद्रकला गावित, राजेंद्र पावरा, महानगर मंत्री रितेश महाजन, प्रीतम निकम, वैभवी ढिवरे, मोनाली जैन यांच्यासह आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.