जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा भागातील गणपती नगरात घरासमोरील रस्त्यावरून वाद घालत पोलिस अमलदार मधु सुरेश तिवाने (४०, रा. गणपती नगर, पिंप्राळा) यांना व त्यांच्या कुटुंबीयांना एका जणाने शिवीगाळ केल्याची घटना मंगळवारी सकाळी मिनीटांनी घडली. या प्रकरणी शिवीगाळ करणाऱ्यावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरात मधु तिवाने या पती व मुलासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजून ५० मिनीटांनी त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या योगेश प्रकाश खडके याने घरासमोर येऊन आरडाओरड करीत होता. त्याला या विषयी विचारले असता त्याने रस्ता सपाट का केला, अशी विचारणी करीत अश्लिल शिवीगाळ केली व महिलेसह त्यांच्या मुलाला मारुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी मधु तिवाने यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश प्रकाश खडके याच्या विरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.