अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील रेल्वे गेट समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हर्षलसिंग नरेंद्रसिंग ठाकूर वय २६ रा. मिल चाळ, स्टेशन रोड अमळनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हर्षलसिंग ठाकूर हा रेल्वे स्टेशनच्या गेटसमोर उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून सलमान शेख रर्फा रा. गांधलीपूरा, अमळनेर याने शिवीगाळ केली व तु जर मला कुठेही भेटला तर मी तुझ्या पोटात चाकू घालून तुला ठार करेल अशी धमकी दिली. याप्रकरणी हर्षलसिंग ठाकूर याने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह दाखाल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.