पैसे मागण्यावरून महिलेला शिवीगाळ करत मुलाला मारण्याची धमकी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील तापी नगर येथे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एका महिलेला दारूच्या नशेत येवून शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी २ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११.३० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कांचन उदय शिंदे वय ४२१ रा. तापी नगर, जळगाव ह्या महिला आपल्या मुलगी व मुलासोबत वास्तव्याला आहेत. महिलेने कामानिमित्त शाहरूख राजू पटेल रा. साकेगाव ता. भुसावळ यांच्याकडून पैसे घेतले होते. मंगळवारी २ जुलै रोजी रात्री १० वाजता शाहरूख पटेल हा दारूच्या नशेत महिलेच्या घरी आला. त्याचे दिलेले पैसे मागत महिलेला व तिच्या मुलीला शिवीगाळ करत मुलाला मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११.३० वाजता शाहरूख राजू पटेल याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ पराग सोनवणे हे करीत आहे.

Protected Content