अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील फरशीरोड येथे राहणाऱ्या महिलेला काहीही एक कारण नसतांना दारूच्या नशेत येऊन शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता ती जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती अशी की, अमळनेर शहरातील फरशी रोड येथे उषाबाई रमेश बिऱ्हाडे वय-४० या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांच्या घराच्याजवळ राहणारा कमाल एजाज शेख हा दारू पिऊन घरासमोर येऊन काही एक कारण नसतांना महिलेला शिवीगाळ केली. दरम्यान याचा जाब विचारला असता कमाल एजाज शेख, रईस एजाज शेख आणि गुणाज कमाल शेख या तिघांनी महिलेला शिवीगाळ केले. तसेच “ही गल्ली तुझ्या बापाची आहे का, आम्ही काही पण करू” असे बोलून दमदाटी केली. दरम्यान या प्रकरणी महिलेने अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रविवारी २८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शिवीगाळ करणारे माल एजाज शेख, रईस एजाज शेख आणि गुणाज कमाल शेख तिन्ही रा. फरशी रोड अमळनेर या तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.