किरकोळ कारणावरून वृध्देला शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील गांधीपुरा येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेला किरकोळ कारणावरून भांडण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकिला आली आहे. या संदर्भात सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील गांधीपुरा भागामध्ये कमलबाई श्रावण संधानशिव (वय ७०) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांनी या भागातील नीलम शेख हरदास यांचे घर गहाण ठेवले आहे. दरम्यान, या कारणावरून त्यांच्या शेजारी राहणारे कुदरत अली भंगारवाला, रियाज मौलाना, कमर अली शहा आणि अखेर मुजाहिद सय्यद सर्व रा. गांधीपुरा, अमळनेर यांनी सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता वृद्ध महिलाही घराची साफसफाई करत असताना महिलेला धमकी दिली. दरम्यान या संदर्भात वृद्ध महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content