भर चौकात तरुणीला शिवीगाळ; एकावर गुन्हा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील तांबापुरा येथील बिलाल चौकात एका तरुणीला शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की सुप्रीम कॉलनीतल्या रामदेव बाबा मंदिरजवळ राहणारी १८ वर्षाची  तरुणी ही रविवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता शहरातील तरुणी तांबापुर येथील बिलाल चौकात असणार्‍या आपल्या मावशीच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने  पुरुषाचा ड्रेस शर्ट आणि पँट परिधान केला होता. तरुणीला मुलगा समजून संशयित आरोपी वसीम घंटे (पूर्ण नाव माहीत नाही) रा. तंबापुरा, बिलाल चौक, जळगाव याने दुकानातून कोल्ड्रिंक्स आणून दे असे सांगितले. त्यावर तिने नकार दिला. याचा राग आल्याने संशयित आरोपी वसीम घंटे याने तरुणीला शिवीगाळ केली. शिवीगाळ करत असताना तिची मावशी समजविण्याचा प्रयत्न करीत असतांना त्यांना देखील गालावर चापट मारून शिवीगाळ केली.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधीत तरुणीने धाव घेऊन तक्रार दिली आहे. तक्रारीवरून संशयित आरोपी वसीम घंटे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन पाटील करीत आहेत.

 

 

Protected Content