Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

0
31

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील उचंदा येथील १६ वर्षाच्या मुलीवर नाराधमाने अत्याचार केल्याची घटना केली असून आरोपी फरार झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील उचंदा येथे एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना आज दिनांक २२ रोजी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान घडली. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार नेपानगर तालुका बर्‍हाणपूर येथील मूळ रहिवासी व सध्या उचंदा येथे हे कुटुंब वास्तव्याला आहे.

त्यांची १६ वर्षांची मुलगी ही पीठ गिरणी मध्ये चप्पल द्यायला गेली असता चेतन रवींद्र सुतार या आरोपीने बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपी सध्या फरार आहे आरोपीवर  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी विवेक लावण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशनचे पथक करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound