मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर व बोदवड नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून सुमारे १० कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे.
मुक्ताईनगर आणि बोदवड येथील नागरिक व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विविध विकास कामांसाठी मंजूरी मिळून निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे आणि राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे मुक्ताईनगर व बोदवड मधील विविध प्रभागात विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली होती.
त्यानुसार नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत दि. ११ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यासाठी ८ कोटी ५० लक्ष रुपये आणि बोदवड नगरपंचायत हद्दीत विविध विकासकामे करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष रुपये असा एकूण १० कोटी रूपये निधी मंजूर झाला असून यातून खालील विकास कामे करण्यात येतील.
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत करावयाची विकास कामे –
1) मुक्ताई नगर नगरपंचायत हद्दीतील प्रवर्तन चौक ते जुने बस स्थानक पर्यंत दुभाजकासह रस्ता डांबरीकरण करणे व जुने बस स्थानक ते श्री स्वामी समर्थ केंद्रापर्यंत व राज डेअरी ते जुने मुक्ताई मंदिराजवळील पुलापर्यंत व पुढील रस्ता दुभाजकासह रस्ता काँक्रीटीकरण करणे.
2) मुक्ताई नगर नगरपंचायत हद्दीतील बुऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ संरक्षण भिंत बांधकाम करणे.
3) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक १ मध्ये कैलास दैवते सुभाष खुळे यांचे घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
4) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रमोद माळी यांचे दुकानापासून ते नदी काठापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
5) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 3 मध्ये शेख बलदार ते शेख लूकमान हाजी यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
6) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये नासिर खान रमजान खान शहा यांचे घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे.
7) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये भुसावळ नाका ते संजय सुरवाडे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
8) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये गुरु पुष्प प्लायवूड ते सुभाष बॉम्बे यांचे घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
9) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक १२ मध्ये आरसीसी गटार बांधकाम करणे
10) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 14 मध्ये आरसीसी गटार बांधकाम करणे
11) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये बाळू पाटील ते सागर मुंडके यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
12) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये लक्ष्मण जुमळे ते निवृत्ती कपडे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
13) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील विविध प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करणे.
14) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील वायकोळे यांचा दवाखाना ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे
15) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये मल्टीपर्पज हॉल बांधकाम करणे
16) मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील आयसीआयसीआय मुकेश वानखेडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करणे
बोदवड नगरपंचायत हद्दीत करावयाची विकास कामे –
1) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील सरस्वती नगरमध्ये रेस्ट हाऊस ते सोपान सावकारे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
2) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा मधील रेणुका देवती मंदिराचे दुरुस्ती व सुशोभीकरण करणे
3) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मधील विविध ठिकाणी आरसीसी गटार बांधकाम करणे
4) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 मधील विविध ठिकाणी आरसीसी गटार बांधकाम करणे
5) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये जावेद कुरेशी यांच्या घरापासून ते राजू मराठे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे.
6) वडनगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 13 मधील शकील बागवान ते मौसम पठाण यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे
7) बोदवड नगरपंचायत हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह समोर आरसीसी गटार बांधकाम करणे
8) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 16 मध्ये विविध ठिकाणी आरसीसी गटार बांधकाम करणे
९) बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये राजू साठे यांच्या घरापासून ते राजू सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधकाम करणे.