जळगावातून रा.काँ.तर्फे अभिषेक पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल (व्हिडीओ)

abhishek patil

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव शहर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी आज (दि.४) आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला.

आज शहरातील काँग्रेस भवनापासून वाजत-गाजत मिरवणुकीने जावून त्यांनी तहसील कचेरीत आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन, काँग्रेस ज्येष्ठ नेते डॉ. अर्जुन भंगाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवार अभिषेक पाटील यांनी बोलतांना सांगितले की, गेल्या निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी निवडूण येण्यापुर्वी जे काही आश्वासन जनतेला दिले होते ते पुर्ण करण्यास असमर्थ झाले आहे. आजची परिस्थिती पाहता गेल्या 15 महिन्यांपासून शहरातील अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. ती अवस्था सुधरविण्यासाठी जनतेने एक वेळा आमदारकीची संधी द्यावी अशी अपेक्षा केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन यांनी सांगितले की, काम करणाऱ्याबरोबर रहायचे की चुकीच्य लोकांसोबत काम करणार हे जनतेचे ठरवायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेतेही सोबत आहे. खडसेंबाबत ते बोलतांना म्हणाले की, माजी मंत्री एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहे. पक्षाने तिकीट दिले नाही हे मुळात चुकीचे आहे. किती दिवस त्यांना खालच्या हाऊसमध्ये किती वर्ष काम करणार? वरच्या देशपातळीवर काम केले पाहिजे, अशी अपेक्षा खडसेंनी वरीष्ठांकडे केली असावी म्हणून पक्षाने हा निर्णय घेतला आहे.

 

Protected Content