यावल प्रतिनिधी | येथील नगर परिषदच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार काही काळासाठी नगर परिषदचे उपनगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी यांचेकडे सोपविण्यात यावा असे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले .
यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांचा नगराध्यक्षपदाचे कार्यकाळ हे २५ डिसेंबर रोजी संपत असून आज दि.१४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी आपल्या खाजगी कामानिमित्ताने बाहेरगावी जात असल्याने आपले काम संपल्यापर्यंत सुटीवर राहणार असल्या कारणाचे लिखित पत्र त्यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सोपविले आहे .
आपण सुटीवर जात असल्याने आपल्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार काही काळासाठी उपनगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी चौधरी यांचेकडे सोपविण्यात यावा असे पत्रात म्हटले असून माझे कामे संपल्यानंतर पूर्ववत नगराध्यक्षपदीची सुत्रे आपल्याकडे घेणार असल्याचे म्हटले आहे. दि.१५ डिसेंबर बुधवारपासून प्रभारी नगराध्यक्षपदी सुत्रे अभिमन्यू चौधरी यांचेकडे राहणार आहे. शुक्रवार, दि.२४ डिसेंबर २०२१ रोजी यावल नगर परिषदच्या नगरसेवकांचे कार्यकाळ संपुष्टात येत आहे .