Home क्राईम अल्पवयीन मुलीचे अपहरण; एकाविरोधात पोलीसात तक्रार

अल्पवयीन मुलीचे अपहरण; एकाविरोधात पोलीसात तक्रार


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथून अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून व आमिष दाखवून अपहरण केल्याची घटना शनिवारी २ सप्टेंबर रोजी समोर आली आहे. याप्रकरणी एकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना गावात राहणारा तुषार हरी शंकर जोहरे याने काहीतरी आमिष व फूस लावून तिचे अपहरण केल्याचे शनिवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आले आहे. तिचा सर्वत्र शोध घेतला पिडीत मुलगी ही कुठेही मिळून आली नाही. अखेर तिच्या नातेवाईकांनी भुसावळ तालुका पोलीसात धाव घेवून तुषार हरी शंकर जोहरे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी तुषार हरी शंकर जोहरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक पुजा अंधारे करीत आहे.


Protected Content

Play sound