अज्ञात व्यक्तीकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरूदत्त कॉलनी राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत अपहरण केल्याची घटना बुधवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील गुरूदत्त कॉलनी परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ११ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिचे अपहरण केल्याचे समोर आले.

 

हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख करीत आहे.

 

Protected Content