Home क्राईम भुसावळात अल्पवयीन मुलीचे अपहरण

भुसावळात अल्पवयीन मुलीचे अपहरण


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून पळविले. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यत अज्ञात व्यक्तीविरोधात अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ हे करीत आहे.


Protected Content

Play sound