नवप्रसूत महिलेला शिवीगाळ तर आई-वडिलांना मारहाण ; जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याची दादागिरी (व्हीडीओ)

6388612f 1e6b 4701 8a81 ef3f988e9bcf

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयातील कंत्राटदार सफाई कर्मचा-याने नवप्रसूत महिलेला अश्लिल शिवीगाळ करून सोबत असलेल्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना आज सायंकाळी घडली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील वाडीशेवाडे येथील रूपाली ज्ञानेश्वर काकडे (वय-25) ही विवाहिता जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात प्रसुतीसाठी गेल्या 20 दिवसांपासून दाखल आहे. यावेळी महिलेसोबत त्यांच्या आई संगिता तुकाराम जाधव (वय-42) व वडील तुकाराम सखाराम जाधव हे पाहिल्या दिवसांपासून सोबत आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात सफाई कर्मचार यश पवन जाधव याला प्रसुती विभागाचा वार्ड क्रमांक 1 सफाई करण्यासाठी दिलेला आहे. या वार्डात रूपालीला देखील प्रसुतीनंतर दाखल केले आहे. महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर बाळास अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून सफाई कर्मचारी त्यांच्या बेडजवळील कोणतीही साफसफाई करत नव्हता. हे चित्र गेल्या 20 ते 22 दिवसांपासून सुरू होते.

 

आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कंत्राटदार कर्मचारी यश जाधव याने सफाई करण्यासाठी आला. यावेळी बेडजवळील साफसफाई केली नाही म्हणून रूपालीच्या आईने खाली जावून झाडू आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी यशनेने झाडू हिसकावून घेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. यानंतर रूपालीच्या आई संगिता या मुलीच्या बेडजवळ गेल्या. सर्व शांत झाले असतांना यशने जिल्हा रूग्णालयात काम करणा-या आपले वडील पवन बाबू जाधव व आई यांना बोलावून रूपाली यांना अश्लिल शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या आई, वडीलांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत पोलीस चौकीत जावून घडलेला प्रकार पोलीसांना सांगितल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस जिल्हा रूग्णालयात दाखल होवून मारहाण करणा-या दोघांना ताब्यात घेत जिल्हा पेठ पोलीसांत नेले. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

Protected Content