जामनेर प्रतिनिधी । शहरात आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला.
यामुळे परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. शहरातील एकलव्य, ज्ञानगंगा, लॉर्ड गणेशा शाळेच्या वतीने सजावट करण्यात आली होती. त्याचबरोबर शहराच्या मुख्य चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरिश महाजन यांनी सपत्नीक नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या सोबत माऊलीच्या पालखीचे स्वागत करत पुजन केले आहे. मिरवणूकीत लेझीम पथक, झांज पथक, ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. न.प.चे गटनेते तथा डॉ.प्रशांत भोंडे, दिपक पाटील, बाबूराव हिवराळे, हेमंत ललवाणी, डॉ.प्रशांत महाजन, पिंटू कोठारी, अनिल बोहरा, आतिष झाल्टे, दिपक तायडे, संतोष बारी व तेजस पाटील आदि उपस्थितीत होते.