Home राजकीय थोरगव्हाण गणातून आरती चौधरी पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार!

थोरगव्हाण गणातून आरती चौधरी पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रबळ दावेदार!


सावदा, ता. रावेरलाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी – येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोरगव्हाण गणात नव्या युवा नेतृत्वाचा झंकार ऐकू येत असून आरती राजेंद्र चौधरी या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे समाजकार्य, लोकसंपर्क आणि प्रामाणिक कार्यशैली या बळावर त्या आगामी निवडणुकीत एक प्रबळ व दमदार दावेदार म्हणून पुढे येत आहेत.

आरती राजेंद्र चौधरी या ग्रामपंचायत सदस्य गहू खेडा राजेंद्र कैलास चौधरी यांच्या पत्नी असून राजेंद्र चौधरी हे सध्या छत्रपती शिवाजी राजे ब्रिगेड, रावेर तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून परिसरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत त्यात रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे त्यामुळे जनतेशी थेट संवाद साधत समाजहिताची कामे करण्याचा अनुभव त्यांना मोठ्या प्रमाणात लाभला आहे.

त्या माध्यमातून आरती चौधरी या स्वतः एक संवेदनशील, तत्पर आणि लोकाभिमुख महिला म्हणून पुढे येत असून, त्यांच्या उमेदवारीकडे मतदारांचा आणि राजकीय वर्तुळाचा विशेष लक्ष लागले आहे. थोरगव्हाण गणात नव्या उत्साहाचे आणि युवा नेतृत्वाच्या आशेचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

समाजसेवा हीच खरी राजकारणाची पायरी आहे या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन आरती राजेंद्र चौधरी या आगामी पंचायत समिती निवडणुकीत थोरगव्हाण गणातून सशक्त आणि प्रबळ उमेदवार म्हणून उभ्या राहण्याची तयारी करत आहेत.


Protected Content

Play sound