सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या लंगडा आंबा येथील गणेशोत्सवात मान्यवर संतांच्या हस्ते आरती करण्यात आली.
सातपुडा डोंगरातील अतिदुर्गम भागातील लंगडा आंबा हे महाराष्ट्रातील शेवटचे अत्यन्त लहान गाव येथे दोनशे लोकसंख्या असून सर्व आदिवासी समाज असून त्यांनी सुद्धा श्री गणेशाची स्थापना केली आहे. या गणेशोत्सव मध्ये महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, जीवन महाराज नाडगावकर, डिंगम्बर महाराज चिनावलकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, माजी जि.प. सदस्य अनिलशेठ खंडेलवाल, वन्यजीव समितीचे अनिल विष्णू नारखेडे या मान्यवरांचे सह संत मंडळी या गणेश उत्सवात सहभागी होऊन त्याठिकाणी सर्व संत व मान्यवरांचे हस्ते आरती पूजा करण्यात आली.
याप्रसंगी लंगडा आंबा गणेश मंडळाचे अध्यक्ष लहुऱ्या आदिवासी यांचे निर्देशानुसार विविध प्रकारचे आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संतांचे आगमनाने गावातील तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अत्यन्त प्रतिकूल परिस्थितीत व दुर्गम भागात अत्यन्त श्रद्धेने गणेशाची उपासना व सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम बद्दल मंडळास संत व मान्यवरांनी बक्षिसे व शेकलेल्या बट्टी चा महाप्रसाद देण्यात आला. या वेळी जंगल संपत्ती व हिंदू धर्म संस्कृती सांभाळत असल्याबद्दल उपस्थित संत मंडळी भारावून गेली.
महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व रवींद्र हरणे महाराज सह संतमंडळी व उपस्थित मान्यवर यांनी मध्यप्रदेश सीमेपर्यंत चे सर्व वनभ्रमण करून दोन दिवस आदिवासी समाज बांधवांशी समरस झाले. यावेळी संपुर्ण परिसराची माहिती अनिल नारखेडे आरएफओ कैलास सोनवणे यांनी दिली या दौऱ्यात प्रदीप राणे अजय बडगुजर राजेंद्र गवारे बोदवड, मयूर नारखेडे, भूषण नारखेडे, तुकाराम बोरोळे यासह कार्यक्रमास लंगडा आंबा उसमली करंजपाणी वाकी येथील आदिवासी बांधव उपस्थित होते.