मुंबई प्रतिनिधी । अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या आरे येथील कारशेडला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज कार्यभार सांभाळल्यानंतर आरे येथील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कार शेडसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून याला नागरिकांनी आधीच मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे. या पार्श्वभूमिवर, आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली घोषणा महत्वपूर्ण मानली जात आहे.