मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जर तुम्ही शासकीय कामांसाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलचा वापर करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा. कारण महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत ‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा खंडित करण्यात आली आहे. या कालावधीत पोर्टलची देखभाल आणि अद्ययावत तांत्रिकीकरणाचे काम करण्यात येणार असल्यामुळे या दरम्यान सेवा तात्पुरती खंडित करण्यात येणार आहे.
आता १० एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल दरम्यान ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सेवा तसेच शासकीय माहिती उपलब्ध राहणार नाही. या कालावधीत सार्वजनिक सुट्या आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी, शासनाच्या विविध विभागांतील कर्मचा-यांनी, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र चालवणा-या कर्मचा-यांनी आणि या सेवेशी संबंधित असणा-यांनी कामांचे नियोजन पूर्वीच करावे. किंवा शक्य असल्यास त्याआधीच महत्त्वाची शासकीय कामे करून घ्यावीत, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.
चार बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावास मंजुरी – दुसरीकडे मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत औद्योगिक वापरासाठीच्या चार बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. मे. मेघा इंजिनीअरिंग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि., हैदराबाद. मेघा इंजिनीअरिंग ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि., हैदराबाद-पाचोरा, जळगाव, नंदुरबार आणि मे. रॉकिंग बॉम्बे ब्रेवरेज – मौजे खानाव, ता. खालापूर, जि. रायगड आणि एनटीपीसी च्या प्रस्तावाच्या बाबतीत सर्वानुमते मान्य. प्रचलित क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादेनुसार पिण्याच्या पाण्यासाठी १५ टक्के आणि औद्योगिक वापरासाठी १० टक्के या मर्यादे अंतर्गत असलेल्या आरक्षण प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार पाटबंधारे विकास महामंडळास देण्यात आले आहेत.