जळगाव (प्रतिनिधी ) महापालिकेला नगरोत्थान योजने अंगतर्गत १०० कोटी रुपये शासनकाडून मंजूर झाले आहेत. या निधीतून शहरातील सर्वच प्रभागांमध्ये रस्ते, गटारी तसेच मुलभूत सुविधांचे विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांना सार्वजनीक बांधकाम विभागाकडून मंजूरी मिळाली असून लवकरच विकास आराखडा तयार करून तो आठवड्याभरात शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
आज सायंकाळी आमदार भोळे यांनी महापालिकेच्या विविध प्रलंबीत कामांबाबत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी शासनाकडून मंजूर झालेल्या शंभर कोटीच्या कामांबाबत प्रस्ताव, विकास आराखडा कुठपर्यंत तयार झाला आहे याची माहिती बांधकाम अभियंता सुनील भोळे यांच्याकडून घेतली. तसेच लवकरात लवकर विकास आराखडा तयार करून आठवड्याभरात शासनाकडे हा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्याच्या सूचना भोळे यांना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी १०० कोटीच्या निधीतून सिमेंट क्रॉकीटचे रस्ते करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यात, ४० कोटीतून शहरातील मुख्य पाच रस्त्यांचे डांबरीकरण तसेच चौक सुशोभिकरण, ५० कोटीतून गटारी, संरक्षण भिंत आदी विविध असे एकून १६२ कामे होणार आहे. शंभर कोटीच्या निधीतून १० कोटी हे आमदार निधीसाठी राखीव केली आहे. या दहा कोटीच्या निधीतून प्रभागांमध्ये विविध विकास कामे केली जाणार आहे.