भडगाव प्रतिनिधी | तालुक्यातील आमडदे येथिल महाराष्ट्र ग्रामीण बँक चोरी प्रकरणी तिघे आरोपिंना भडगाव कोर्टाने ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील आमडदे येथे महाराष्ट्र ग्रामीण बॕकेत कार्यरत कर्मचारी व त्याचे दोन साथीदार यांनी बॕकेत मोठा डल्ला मारत बॕकेच्या तिजोरीत दोन चौकोनी स्टील डब्यात ठेवलेल्या ३ कीलो ६५५ ग्रॅम वजनाचे सोने व सीसीटीव्ही चा डीव्हीआर ज्याचे बाजारमुल्य ३ कोटी १७ लाख ९० हजार लंपास केले होते. तपासाअंती या चोरी प्रकरणी बॕकेचे शिपाई राहुल पाटील व त्याचे अन्य दोन साथीदार विजय नामदेव पाटील, बबलु उर्फ विकास तुकाराम पाटील रा आमडदे यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली होती. त्यांना आज भडगाव न्यायालयात तपास अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी तिघा आरोपींना भडगाव न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर जे ठाकरे यांचे समोर हजर केले. यावेळी गुन्ह्याच्या बाबतीत विशेष सह सरकारी वकील व्ही डी मोतिवाले यांनी भक्कम युक्तिवाद केला. न्यायालयाने तिघं आरोपींना दि २८ नोहेबर २०२१ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.